सिंधुदुर्ग प्रतिनिधी - राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत प्रयत्नशील असणारी व त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी लढणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षक संघटना म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटना ओळखली जाते . संघटनेची राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष आकाश तांबे साहेब यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष पद हे विदर्भाकडे , मुख्य संघटक सचिवपद खानदेश कडे तर सरचिटणीसपद मुंबई विभागाकडे देण्यात आले आहे. या राज्य कार्यकारणीचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भ,मराठवाडा, खानदेश, कोकण, मुंबई हा प्रादेशिक समतोल साधून या निवडी जाहीर करण्यात आल्याचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांनी सांगितले. ३१ जणांच्या राज्य कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सात सदस्य, विदर्भातील सात सदस्य, मराठवाडय़ातील पाच सदस्य, कोकण- मुंबईमधील सात सदस्य तर खानदेशमधील पाच सदस्य याप्रमाणे प्रादेशिक समतोल साधण्यात आला आहे. तसेच या कार्यकारिणीत महिलांनाही प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. ही राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे
आकाश गंगाराम तांबे, राज्यध्यक्ष (सिंधुदुर्ग), किरण मानकर, कार्याध्यक्ष (यवतमाळ), बाजीराव प्रज्ञावंत, वरिष्ठ उपाध्यक्ष (सांगली) , श्रीशैल कोरे, उपाध्यक्ष (सोलापूर), नरेंद्र मोरे, उपाध्यक्ष (ठाणे), राहुल गायकवाड, उपाध्यक्ष (लातूर), प्रदीप वाघोदे, कोषाध्यक्ष (रत्नागिरी) रवींद्र पालवे, राज्य सरचिटणीस (पालघर) महेश कांबळे अतिरिक्त, सरचिटणीस (लातूर), तुषार आत्राम, अतिरिक्त सरचिटणीस( यवतमाळ), प्रशांत बोर्डे, अतिरिक्त सरचिटणीस (बुलढाणा), गौतम वर्धन, अतिरिक्त सरचिटणीस (कोल्हापूर), राजेंद्र वाघमारे, अतिरिक्त सरचिटणीस (यवतमाळ), डॉ. पारस जाधव, अतिरिक्त सरचिटणीस (सिंधुदुर्ग) तसेच मुख्य संघटक सचिव म्हणून प्रभाकर पारवे (जळगाव) यांची निवड करण्यात आली. याच बरोबर राजू रणदिवे, संघटन सचिव (पुणे), मारुती कांबळे, संघटन सचिव( सिंधुदुर्ग), ज्ञानेश्वर कुंबरे, संघटन सचिव (सिंधुदुर्ग), गोकुळ वाघ, संघटन सचिव (नाशिक), केशव वैद्य, संघटन सचिव (वाशिम), संजय कुर्डूकर विभागीय अध्यक्ष, (कोल्हापूर), शशिकांत गायकवाड विभागीय अध्यक्ष (अमरावती), सुभाष मस्के, विभागीय अध्यक्ष( लातूर) डॉ. सिद्धार्थ मस्के, विभागीय अध्यक्ष (औरंगाबाद), महेश अहिरे, विभागीय अध्यक्ष (नाशिक), संतोष आत्राम, विभागीय अध्यक्ष( नागपूर) व प्रशांत मोरे, विभागीय अध्यक्ष( पुणे) या विभागीय अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून प्रमोद काकडे (सांगली),शंकर धावरे (परभणी) यांची निवड करण्यात आली. तर महिला प्रतिनिधी म्हणून वंदना भामरे( धुळे) व विनोदिनी मिरजकर (सांगली) यांना राज्य कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे. संघटनेचे कार्य व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे राज्य कार्यकारणीतील नवनिर्वाचित सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.