उत्तम आरोग्यासाठी आपली चयापचय क्रिया चांगली व्हावी यासाठी काय करावे ? काय करू नये.. जाणून

Admin

 उत्तम आरोग्यासाठी आपली चयापचय क्रिया चांगली व्हावी यासाठी काय करावे ? काय करू नये.. जाणून घेऊ... 

विवेक वार्ता सांगली :- आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी, चांगला, पौष्टिक योग्य आहार घेणे आणि योग्य वजन असणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी आयुष्यासाठी आपले वजन खूप कमी किंवा जास्त नसावे. आपला चयापचय दर योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपले शरीर अन्नातून पोषक तत्त्वे योग्य प्रकारे शोषून घेईल, त्यातून शरीर पुरेशी ऊर्जा मिळवू शकेल, कॅलरी योग्यरित्या बर्न करू शकेल आणि लठ्ठपणा येऊ देणार नाही. जेव्हा आपली चयापचय क्रिया योग्य असते, तेव्हा आपण जे अन्न घेतो ते योग्यरित्या ऊर्जेत रूपांतरित होते आणि आपल्या शरीरात चरबीच्या रूपात साठवले जात नाही. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी जलद चयापचय होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मंद चयापचय क्रियेमुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्याचा पचनावरही परिणाम होतो. शरीरातील मेटाबॉलिज्म म्हणजे चयापचय वाढवण्यासाठी तज्ज्ञांनी  काही उपाय सुचवले आहेत .


)आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश

प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. शरीराच्या योग्य विकासासाठी प्रथिनेयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. प्रथिने देखील चयापचय वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

प्रथिनेयुक्त आहार कॅलरीचे ऊर्जेत रूपांतर करून चयापचय दर वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 


२)शांत चांगली झोप आणि हायड्रेटेड राहणे : चयापचय वाढविण्यासाठी, चांगली झोप घेणे आणि शक्य तितके पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. चयापचय मंद होण्यास आपल्या खाण्याच्या सवयीच जबाबदार न झोपही कारणीभूत आहे. जेव्हा आपण पूर्ण झोप घेतो तेव्हा आपले चया योग्यरित्या कार्य करते.


३) आहारात व्हिटॅमिन बी युक्त पदार्थ :- चयापचय वाढविण्यासाठी व्हिटॅमिन बी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असेल. व्हिटॅमिन पालक, केळी आणि संपूर्ण धान्यात आढळते. 


४)डाएटिंग टाळावे : वजन कमी करण्यासाठी बरेचदा लोक दीर्घकाळ काहीही खात नाहीत. अनेक वेळा दिवसाचे मोठे जेवण देखील वगळले जाते. यामुळे वजन कमी होते नाही पण तुमची चयापचय क्रिया मंदावते. क्रॅश डायटिंग किंवा जेवण वगळल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होणार नाही आणि असे केले तरी ते फार काळ टिकणार नाही. काही वेळाने तुमचे वजन पुन्हा वाढेल. म्हणून, चयापचय निरोगी ठेवण्यासाठी, नियमित अंतराने खाणे आवश्यक आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top