मकर संक्रांती सांस्कृतिक व शास्त्रीय, खगोलीय महत्त्व.

Admin

 मकर संक्रांती सांस्कृतिक व शास्त्रीय, खगोलीय महत्त्व. 


   विवेक वार्ता - भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. यानंतर रात्री लहान व दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतू बदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते.



 

 संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याची पद्धत ही आहे. "मकर संक्राती" यामध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे मकर जो एक तारका समूह आहे आणि संक्रात किंवा संक्रमण म्हणजे स्थित्यंतर. मकर ही रास म्हणून आपण ओळखतो. यासाठी आपल्याला वेध लागतात १४ जानेवारी चे पण या वेळेच्या प्रमाणे कधी कधीही तारीख १५ जानेवारी असते. काय आहे खगोलीय गुपित चला तर पाहू. 


 मकर संक्रांती नव्या वर्षाचा पहिला सण तिळाच्या खमंग वड्या आणि पोळ्या खात एकमेकांशी गोड बोलण्याचा संकल्प करीत आणि वचने देत हा सण आपण साजरा करतो. भारतामधील भौगोलिक विविधतेमुळे हा सण ठीक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आणि नावाने साजरा होतो. तर राजस्थान आणि गुजरात मध्ये उत्तरायण नावाने साजरा होतो. हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब मध्ये माधी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आसाम मध्ये माघ बिहू किंवा भोंगली विह नावाने साजरा होतो. काश्मीरमध्ये शिशूर सेंक्रांत, केरळमध्ये मकरा विलाकू या नावाने साजरा होतो. भारताबरोबर नेपाळ, थायलंड लाओस, कंबोडिया, म्यानमार या देशांमध्ये देखील संक्रांती साजरी केली जाते. याला सामाजिक सांस्कृतिक आयाम तर आहेच पण खगोलशास्त्रीय दृष्टीने खूप महत्त्व आहे. पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे याला आयनांस असेही म्हणतात. पृथ्वीवर अनेक वलये काम करीत असतात आणि त्यामुळे पृथ्वीला वेगवेगळ्या गती आहेत. जसे स्वतःभोवती ती फिरते तशीच ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीला परांचन गती देखील आहे. ही झुकलेल्या अक्षांमुळे आहे. 


 यामध्ये पृथ्वी एखाद्या झुकलेल्या भोवऱ्यासारखी फिरते. त्यामुळे त्याची एक परांचन कक्षा तयार होते. त्यावर अनेक तारे आहेत. जेव्हा पृथ्वीचा उत्तराक्ष परांचन कक्षेतील ज्या ताऱ्याकडे रोखलेला असतो, तो त्यावेळी पृथ्वीचा ध्रुवतारा असतो. ही परांचन कक्षा पृथ्वी सव्वीस हजार वर्षांमध्ये पूर्ण करते. साधारण पाच हजार वर्षांपूर्वी आपला ध्रुव हा ठुबान तारा होता. पुढे बारा हजार वर्षांनी आपला ध्रुव अभिजीत तारा असेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्या अशा अनेक गतींमुळे आपल्याला विविध ऋतू अनुभवता येतात. मकर संक्रांती या  नावावरूनच आपल्याला सणांचे संदर्भ लक्षात येतात. आपले सण हे आकाशातील बदलांशी आणि पर्यायाने ऋतूंशी जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. प्रवेश करतो म्हणजे काय? तर सूर्याच्या पार्श्वभूमीवर मकर रास आपल्याला दिसते आणि महिनाभर ती या राशीमध्ये असते.

 

आपल्या राशीचक्रामध्ये मकर ही दहावी रास आहे. सुरुवातीपासून अंश मोजले तर ती बरोबर २७० अंशावर आहे. मकर जेव्हा या बिंदूवर येतो तेव्हा आपण असे म्हणतो की सूर्याने मकर राशीत प्रवेश केला. आपले बहुतेक सर्व सण हे हिंदू कॅलेंडर प्रमाणे आहेत. यात चंद्राची स्थितीही प्रमाण स्थिती मानली जाते .त्यामुळे बहुतेक सर्व सणांच्या तारखा आपल्याला बदललेल्या दिसतात हा एकमेव सण असा आहे की तो अनेक वर्षे एकाच तारखेला येतो. कारण तो सौर कॅलेंडरला अनुसरून आहे. संक्रांत ही साधारणपणे १४ जानेवारी किंवा त्यावेळी प्रमाणे १५ जानेवारीला येते पण ही स्थिती सध्याची आहे. कायम राहणार नाही आणि पूर्वी देखील नव्हती. लीप वर्षांमध्ये ही


१५, जानेवारीला येते आणि एरव्ही १४ जानेवारीला म्हणजेच १४, १४, १४,१५ हे जानेवारीचे चक्र चालू राहते. गेली ४० वर्षे आपण याच पद्धतीने संक्रांत पाहिलेली आहोत.पुढेही असेच चालू राहणार आहे. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top