नवभारत साक्षरता कार्यक्रमावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बहिष्कार...

Admin

 नवभारत साक्षरता कार्यक्रमावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बहिष्कार.. 


विवेक वार्ता सांगली (प्रतिनिधी) - 

केंद्र सरकारने देशातील निरक्षरता दूर करण्यासाठी व त्यांची माहिती गोळा करण्यासाठी राज्य शासनाला आदेशित केले आहे. त्यानुसार  नवभारत साक्षरता अभियान जाहीर केले आहे. या अभियानांतर्गत सर्व शिक्षकांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. याबाबत चर्चा करणेसाठी मा. .महेश पालकर  शिक्षण संचालक (योजना) यांच्या सोबत झालेल्या संघटनांच्या  सहविचार  सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेने नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची भूमिका कायम ठेवली आहे . आजच्या बैठकीमध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. प्रशांत मोरे यांनी उपस्थित राहून श्री.महेश पालकर  मा.शिक्षण संचालक (योजना) यांच्यासमोर कास्ट्राईब शिक्षक संघटनेची भूमिका स्पष्ट केली. मा. शिक्षण संचालक (योजना) , पुणे यांनी श्री आकाश तांबे  सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना यांना पत्र देऊन सहविचार सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.

नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संघटना सहविचार सभा सायरस न्यू. इग्लिश स्कूल  रास्ता पेठ पुणे येथे मा.शिक्षण संचालक श्री. महेश पालकर, उपसंचालक श्री. राजेश क्षीरसागर,  एन. सी. आर. टी उपचालिका श्रीमती बेलसरे मॅडम यांच्या उपस्थितीत पार पडली.  राज्यातील  सर्व शिक्षक संघटना व मुख्याध्यापक संघटना यांनी यावेळी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. 


    कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष श्री प्रशांत मोरे यांनी बहिष्कार टाकल्याची भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली व निवेदन दिले .यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top