सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू

Admin

 सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये  वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू भिलवडी प्रतिनिधी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.हा महोत्सव दि. ३०नोव्हें. ,१,२ डिसें. या तीन दिवशी चालणार आहे. 
यावेळी  शाळेचे माजी विद्यार्थी, खेळाडू, राष्ट्रीय व्हाँलीबॉलपटू श्री. संकेत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुलांनी आभासी खेळ खेळणे सोडून मैदानी खेळात सहभाग घ्यावा तसेच आपल्या शरीराच्या सुदृढतेसाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे. आपली क्रीडा संस्कृती खूप जुनी आहे आणि ती जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धात यश किंवा अपयश महत्त्वाचे नसून एक लढण्याची जिद्द, सांघिक भावना निर्माण करण्याचा हेतू महत्वाचा असतो. यासाठी विद्यार्थ्यांनी चिकाटीने या स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते असे विचार संकेत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू सानवी कोळी हिने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक देशपांडे  होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक जेष्ठ क्रीडा शिक्षक रघुनाथ हिरुगडे यांनी केले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत,  सेमी इंग्लिश विभागाचे मुख्याध्यापक तुषार पवार, के. डी. पाटील , ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख जी. एस. साळुंखे, पी. पी. पाटील,  प्रमोद काकडे, शिवाजी कुकडे,  महेश पुजारी, पी. बी. पाटील, धनाजी राजमाने, सौ. आर. झेड तांबोळी, अनुराधा शिंदे, एम. बी. पाटील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार निलेश कुडाळकर यांनी मानले.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top