भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार परिषद संपन्न.

Admin

 भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार परिषद संपन्न. 

विवेक वार्ता भिलवडी-   भिलवडी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची रूपरेषा सांगण्यासाठी संस्था पदाधिकारी, शिक्षक, भिलवडी व परिसरातील सर्व पत्रकार यांच्या समवेत पत्रकार परिषद संपन्न झाली. संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुनिल वाळवेकर, संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. भिलवडी शिक्षण संस्थेचे आम्ही विद्यार्थी असल्याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे, सेवाभावी वृत्तीने संस्थेने सुरू केलेल्या शैक्षणिक कार्यास आमच्या शुभेच्छा असून भविष्यात संस्थेच्या विधायक विविध उपक्रमांना योग्य अशी प्रसिद्धी देवू असे मनोगत उपस्थित पत्रकार बंधूंनी व्यक्त केले. सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी संस्थेच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर सह सचिव के. डी पाटील यांनी आभार मानले.


    या पत्रकार परिषदेस प्रदीप माने, दिपक पाटील, अभिजित रांजणे, घनश्याम मोरे, भाऊसाहेब रूपटक्के, संदीप नाझरे, रोहित रोकडे, पंकज गाडे, शरद जाधव, जमीर सनदी, समीर कुलकर्णी, सचिन टकले, प्रमोद काकडे आदी सह विविध प्रिंट व डिजीटल मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. दिपक देशपांडे, प्रा. एम. आर पाटील, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, खाजगी प्राथमिकचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, इंग्लिश मिडीयमच्या विद्या टोणपे,स्मिता माने, सुचेता कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top