नवभारत साक्षरता अभियांतर्गत निरक्षर सर्वेक्षणावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बहिष्कार

Admin

 नवभारत साक्षरता अभियांतर्गत निरक्षर सर्वेक्षणावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बहिष्कार


विवेक वार्ता  (प्रतिनिधी) 

   नुकतेच राज्य शासनाने परिपत्रक काढून नवभारत साक्षरता अभियांनातर्गत निरक्षर सर्वेक्षण करण्याचा आदेश केला आहे. या बाबत मा. शरद गोसावी साहेब ,शिक्षण संचालक (प्राथमिक )महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन देऊन कास्ट्राईब शिक्षक संघटनेने नवभारत साक्षरता निरक्षर सर्वेक्षणावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. रविंद्र पालवे, सरचिटणीस आकाश तांबे ,संघटन सचिव राजू रणदिवे, दिलीप पवार इत्यादी उपस्थित होते.

    नवभारत साक्षरता अभियांतर्गत निरक्षरांचा सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून आदेश करण्यात आलेले आहेत.राज्यात शिक्षकांची भरती न झाल्यामुळे शिक्षकांची अनेक पद रिक्त आहेत. शिक्षक सध्या  शासनाच्या स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम करीत आहेत. यापूर्वी सेतू चाचण्या,पायाभूत चाचण्या, सेतू उत्तर चाचणी इत्यादी पेपर घेण्यामध्ये व्यस्त होते. आता विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहे .शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ  मिळावा . नवभारत साक्षरता अभियांतर्गत निरक्षर लोकांचे सर्वेक्षणाचे काम शिक्षकांना दिल्यास महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी  , खाजगी अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होईल. सदर काम हे  अशैक्षणिक कामात मोडते. जनगणना व निवडणूक काम वगळता इतर कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे सदर सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून काढून घेऊन इतर यंत्रणेमार्फत करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद,  नगरपरिषद खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा यामधील कार्यरत शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे काम करू द्यावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास प्राधान्य देत सदर कोणत्याही अशा अशैक्षणिक कामासाठी आमच्या शिक्षकांच्या नेमणुका करू नये. 

  सदर सर्वेक्षणाच्या कार्यक्रमाला आमच्या संघटनेचा विरोध असून त्यावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा बहिष्कार आहे .असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सचिव आकाश तांबे यांनी जाहीर केले आहे.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top