शिक्षणाच्या खाजगीकरण, समूह शाळा योजना, नोकऱ्यातील कंत्राटीकरण या शासनाच्या धोरणा विरूद्द, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सांगलीत भव्य महामोर्चा

Admin

 शिक्षणाच्या खाजगीकरण, समूह शाळा योजना, नोकऱ्यातील कंत्राटीकरण या शासनाच्या धोरणा विरूद्द, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सांगलीत भव्य महामोर्चा 



विवेक वार्ता सांगली - राज्य शासनाच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण तसेच प्राथमिक शाळांच्या समूह शाळा व दत्तक शाळा योजनेला विरोध करण्यासाठी बहुजन शिक्षण हक्क विचार  कृती समितीच्या वतीने आमदार अरुणआण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.मोर्चा कर्मवीर भाऊराव पुतळ्यापासून स्टेशन चौक पर्यंत काढण्यात आला.


 यावेळी सभेचे आयोजन करण्यात आले.  आमदार अरुणआण्णा लाड यांनी सध्या राज्य शासन शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत क्षेत्रामध्ये तसेच सरकारी क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचे आणि कंत्राटीकरणाचे धोरण राबवत आहे.भारतीय संविधानानुसार केंद्र शासन व राज्य शासन यांची मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी असताना शासन यापासून पळवाट काढत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. तसेच शासनाच्या या धोरणामुळे बहुजनांच्या मुलांची शिक्षणाची दारे व बहुजनांच्या मुलांना गुणवत्तेनुसार मिळणाऱ्या नोकरीचे दारे बंद करण्याचा शासनाचा डाव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शासनाच्या या धोरणामुळे पुढील पिढीच्या भविष्यासाठी धोकादायक ठरणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.  समूह शाळा योजना राबवून कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय म्हणजे वाड्या-वस्त्यावरील बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.  हा सरकारचा डाव कदापी सहन केला जाणार नाही असे विचार त्यांनी व्यक्त केले.   






  यावेळी संस्थाचालक अध्यक्ष रावसाहेब पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव, कॉम्रेड बाबुराव गुरव, मा. पृथ्वीराज पाटील, आमदार सुमनताई पाटील, कॉ. भारत पाटणकर, बाळासाहेब होनमोरे, विनायक शिंदे, विजयकुमार कांबळे,  कास्ट्राईब शिक्षक संघटना विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, सचिव विद्याधर रास्ते, कार्याध्यक्ष सुरेश कोळी, महिला आघाडी प्रमुख संगिता कांबळे, उपाध्यक्ष उत्तम मंगल, मनपा क्षेत्र अध्यक्ष सौ. पुष्पा माळी, आदी पदाधिकारी व शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर जुनी पेन्शन संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, मागासवर्गीय संघटना, बहुजन कर्मचारी संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, प्रोटान संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, महाविद्यालय सुटा संघटना, शिक्षक परिषद, आदी सह सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या  संख्येने उपस्थित होते. 



संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top