१० वीचे विद्यार्थी बनले शिक्षक 'शाळेत अध्यापनाचा घेतला अनुभव' : शिक्षक दिनी विविध उपक्रमांचे आयोजन

Admin

 १० वीचे विद्यार्थी बनले शिक्षक 'शाळेत अध्यापनाचा घेतला अनुभव' :  शिक्षक दिनी विविध उपक्रमांचे आयोजन. 


विवेक वार्ता विटा प्रतिनिधी - ५ सप्टेंबर भारताचे मा. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण देशभरात 'शिक्षक दिन' म्हणून साजरी होते. भारती विद्यापीठ संचलित, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक येथे शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 

  विद्यालयातील इ. १० वीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेच्या कामकाजाचा अनुभव घेत इ.५ वी ते ९ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना वर्गाध्यपन केले. शालेय तासिकेनुसार विद्यार्थी शिक्षकांनी कामकाज यशस्वी केले. एकदिवशीय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी घेतलेला अनुभव हा अविस्मरणीय ठरला. शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून १० वीचा सुरज भारते तर उपमुख्याध्यापिका म्हणून सानिका खराडे, उपमुख्याध्यापक शुभम कुंभार यांनी उत्कृष्ट कामकाज केले.


    यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते करत शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

  कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.बी.कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद व्यक्त करत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचारित्राचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

यावेळी लोखंडे एस.बी. हसबे. के.एस. बाजीराव प्रज्ञावंत  व नितीन चंदनशिवे. आदी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली.

    शिक्षक दिना निमित्ताने विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर सेवकांचा सन्मान सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक डी.बी.कदम, लोखंडे एस.बी, बाजीराव प्रज्ञावंत, कमल हसबे, अनिल मगदूम, नितीन चंदनशिवे, मकरंद आमले, शब्बीर पटेल, ए. बी पाटील यांच्यासह विद्यार्थी मुख्याध्यापक सुरज भारते, उपमुख्याध्यापिका सानिका खराडे, उपमुख्याध्यापक शुभम कुंभार यांचेसह विद्यार्थी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रणाली कदम यांनी , सुत्रसंचलन कल्याणी जाधव  यांनी केले.तर आभार अदिती कदम यांनी मानले. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top