सां. मि. व कु. महानगरपालिकेच्या सहाय्यक लेखाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल गौतम कांबळे यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे वतीने सत्कार.
विवेक वार्ता सांगली. - सांगली जिल्हा कोषागार कार्यालयात डेप्युटी अकाउंट पदावर कार्यरत असलेले गौतम कांबळे यांची सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या लेखा विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा सांगली च्या वतीने विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला. गौतम कांबळे साहेब यांनी आपल्या सेवा कालावधीत अन्न धान्य वितरण कार्यालय सोलापूर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली, सांगली कोषागार कार्यालयात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. नुकतीच त्यांची पदोन्नतीने सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत बदली झाली आहे. व त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. याबद्दल विभागीय अध्यक्षांनी त्यांचा सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी सदाशिव चौगुले, शितल गोरूले, स्वाती यादव,सौ.हसुरकर आदी उपस्थित होते.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.