जिल्हा परिषद उर्दू शाळा बुधगाव मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Admin

जिल्हा परिषद उर्दू शाळा बुधगाव मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या  उत्साहात साजरा . 


विवेक वार्ता सांगली-

- बुधगाव येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेत ७७वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आजचा दिवस हा स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीकारकांना स्मरण करण्याचा आहे त्यांच्या त्यागातून आजचे हे स्वातंत्र्य आपण उपभोग असल्याचा संदेश श्री.पाटील यांनी दिला. 


.    पाहुण्यांचे स्वागत व सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हुसेन जमादार, उपाध्यक्ष आरीफ गंजिहाल यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. तय्यबअली नदाफ यांनी केले. तसेच आभार कदिर अहमद, बोरगावकर यांनी मानले.
या कार्यक्रमाचे नियोजन तसनीम तोदलबाग व मुजबबीन मुशरीफ यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदिप निकम,  हाजी नजीर, हाजी रमजान मुलाणी, राहुल पाटील, दयानंद गजबरे, उमराणी सर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top