देशनिष्ठा उरात ठेवून, समाजाचा विचार करून शिक्षण घ्या - सदानंद भागवत

Admin
देशनिष्ठा उरात ठेवून, समाजाचा विचार करून शिक्षण घ्या - सदानंद भागवत
भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा, थोर समाजसेविका कै. डाॅ. चंद्राताई शेणोलीकर यांचा २८ वा स्मृतिदिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत हे होते. सकाळी प्रमुख पाहुणे, भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, विश्वस्त, सर्व संचालक यांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या समाधीचे पुजन करून दर्शन घेण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांसाठी उद्बोधन आयोजित करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रमुख पाहुण्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सह सचिव के. डी पाटील यांनी करून दिला.
मुख्याध्यापक संजय मोरे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
देशनिष्ठा, राष्ट्र प्रथम हे विचार डोक्यात ठेवून आदर्श समाज निर्माण करण्यासाठीचे शिक्षण घेतले पाहिजे. काही मूल्य जोपासली पाहिजेत. त्याची सुरुवात स्वतःपासून केल्यास देशाची प्रगती होऊ शकते व आपण महासत्ता बनवू शकतो. आपण देशाचे काही देणे लागतो हा विचार प्रत्येकाने मनी बाळगला पाहिजे असे विचार प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या जीवन  चरित्राचे क्रमशः वाचन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. याचे वाचन सौ. नाईक  यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा. दीपक देशपांडे हे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव मानसिंग हाके,पर्यवेक्षक विनोद सावंत, सर्व शिक्षक बंधू-भगिनी तसेच सीनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पौर्णिमा धेंडे यांनी केले तर आभार रुपेश करपे यांनी मानले.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top