बाप रे बाप नाहीतर होईल डोकेदुखीचा..... ताप..

Admin
बाप रे बाप नाहीतर होईल डोकेदुखीचा..... ताप.. 
 आजच्या धावपळीच्या जगात मानसिक ताण तणाव किंवा स्नायूंच्या आकुंचनामुळे होणारी डोकेदुखी सर्वत्र आढळते.  प्रत्येक डोकेदुखी करता वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज पडतेच असे नाही. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण त्यांच्यामुळे होते.आणि तिच्यावर औषध उपचार घरीच केला जाऊ शकतो .परंतु काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते. आणि त्यामुळे वैद्यकीय मदतीची गरज भासते.
डोकेदुखीचा त्रास वयाच्या कुठल्या टप्प्यावर सुरू होईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा सुरुवातीला डोकेदुखी कशामुळे होते हेही कळत नाही. काही वेळा डोकेदुखी थोड्या वेळासाठी होते आणि आपोआप बरी होऊन जाते. पण फारच डोकं दुखत असेल तर त्या बाबतीत हयगय न करणे योग्य ठरेल. वेळीच वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे ठरते. डोकेदुखीत शुद्ध हरपत असेल, गोंधळायला  होत असेल, दृष्टीत फरक पडत असेल, शारीरिक अशक्तपणा येत असेल किंवा तापाबरोबर डोकेदुखी होत असेल. तर डॉक्टरी सल्ल्यांची गरज आहे हे समजावे. डोकेदुखी  एकाच प्रकारची असत नाही. ताण (टेन्शन) मायग्रेन( अर्धशिशी) आणि क्लस्टर हे डोकेदुखीचे प्रकार आहेत. मायग्रेन व क्लस्टर हे व्हॅस्क्युलर डोकेदुखीचे प्रकार आहेत. त्यात शारीरिक श्रम जास्त त्रासाचे ठरतात. डोक्याच्या पेशीमधील रक्तवाहिन्या यात सुजतात किंवा पसरतात. त्यामुळे ठणका लागून डोके दुखते.   अलीकडे अनेक जणांच्या बोलण्यात मायग्रेन चा उल्लेख येतो. अशी डोकेदुखी जिचे वर्णन करता येत नाही, असा ठणका लागतो की काही विचारायची सोय नाही, असे काही जण सांगतात. वैद्यकीय संदर्भाने विचार केला तर मायग्रेन डोकेदुखीचा प्रकार प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. पण सामान्यतः त्याच्या लक्षणांमध्ये डोक्याच्या दोन्ही किंवा एका बाजूला खूप दुखणे आणि मळमळ किंवा उलटी, प्रकाश सहन होणे, दृष्टीत गोंधळ, चक्कर येणे, ताप व थंडी वाजणे अशी लक्षणे आढळतात.
मायग्रेन डोकेदुखीला अनेक  गोष्टी कारणीभूत असतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या आहाराचे वावडे असते. त्यामुळे त्यांच्या डोक्यास ठणका लागतो. काहींना वाईन, चॉकलेट, जुने चीज, प्रक्रिया केलेले मांस, तसेच कॉफीन व अल्कोहोलमुळे देखील मायग्रेन उद्भवते. आपल्याला नेमका कशामुळे डोकेदुखीचा त्रास होतो याचे सजगपणे निरीक्षण केल्यास उपायांची दिशा सापडू शकते. क्लस्टर  डोकेदुखी हे मायग्रेन पेक्षा जास्त प्रमाणात आढळते. ती सामान्यतः पुन्हा पुन्हा होत राहते. कधी आठवडाभर, कधीकधी महिने महिने टिकून राहते. सामान्यतः पुरुषांमध्ये ही क्लस्टर डोकेदुखी मोठ्या प्रमाणात आढळते. आणि ती अत्यंत वेदनादायी असते. तसे पाहिल्यास साधारणपणे ही डोकेदुखी गंभीर प्रकारची नसते. आणि साधारणपणे औषधाने बरे होते. पण मायग्रेन किंवा इतर प्रकारच्या गंभीर डोकेदुखी मध्ये वैद्यकीय मदत आणि निरीक्षणाचे गरज पडतेच पडते. मानसिक तणावामुळे किंवा स्नायूंच्या आकुंचनामुळे होणारे डोकेदुखी देखील सर्वत्र आढळणारी असल्यामुळे सामान्य माणसाला सामान्य प्रकारचे मानली जाणारी डोकेदुखी असते. आणि ताणतणावाच्या काळाबरोबर ती देखील वाढत जाते.
मानसिक कारणामुळे होणारे डोकेदुखी बहुतेक स्थिर व कमी त्रासदायक असते. ही डोकेदुखी  कपाळ, कानशिले आणि मानेच्या मागील बाजूला जाणवते. मानसिक ताणा मुळे होणारी डोकेदुखी इतर कुठल्याही लक्षणाशी निगडित नसते. आणि मायग्रेन डोकेदुखी मध्ये कोणत्याही प्रकारची पूर्ण लक्षणे दिसून येत नाही. सर्व प्रकारच्या डोकेदुखी मागील कारण 90% व्यायाम न करणे, मानसिक ताण हाच असू शकते. सायनस डोकेदुखी हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. सायनस डोकेदुखी ही सायनस संसर्ग किंवा ऍलर्जी. म्हणून सायनस डोकेदुखीची सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे असतात. डोळे लाल आणि कपाळावर दबाव पडतो आणि खूप दुखते. वरच्या दातांमध्ये दुखल्यासारखे वाटते.
ताप व थंडी वाजून येते. चेहऱ्यावर सूज येणे इत्यादी कारणे दिसून येतात सर्दी किंवा फ्लू यानंतर होणारी ही डोकेदुखी नाकाच्या वर आणि मागे असलेल्या हाडांच्या पोकळीतल्या सायनस मार्गात सुरू झाल्याने होते. सायनस तुंबल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास तो ताण डोक्यावर पडतो आणि डोकेदुखी होते. मायग्रेन सायनस मानसिकताणातून उद्भवणारी डोकेदुखी. हा प्रकार कुठलाही असो हा त्रास वयाच्या कुठल्या टप्प्यावर सुरू होईल हे काही सांगता येत नाही. आणि अनेकदा सुरुवातीला डोकेदुखी कशामुळे होते हे उलगडत नाही. पण फारच आणि वारंवार डोके दुखत असेल तर त्याबाबतीत हयगय न करणे योग्य ठरेल. 


संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top