फणस आरोग्यवर्धक ....., कर्करोगास प्रतिबंध करण्यासही गुणकारी...

Admin

 फणस आरोग्यवर्धक ....., कर्करोगास प्रतिबंध करण्यासही  गुणकारी...विवेक वार्ता -

  फणसाचे गोड गरे खाणे कुणाला आवडत नाही? फणसाला इंग्रजीत जॅक फ्रुट म्हणतात हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. फणसाचे अनेक उपयोग आहेत. त्याच्या विविध भागांचा आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयोग केला जातो.

भारत,इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये फणस आवडीने खाल्ला जातो. फणसाच्या गऱ्यांबरोबरच त्याच्या बियाही उकडून किंवा भाजी करून खाल्ल्या जातात. मात्र केवळ चवीसाठीच नव्हे, तर विविध पोषक घटकांसाठीही फणस महत्वाचा ठरतो. फणसातील काही पोषकतत्वांबद्दल जाणून घेऊ. 

१०० ग्रॅम फणसामध्ये दैनंदिन आवश्यकतेच्या २५ टक्के इतकें 'क' जीवनसत्व असतं. तसेच १५ टक्के इतकं पोटॅशियम असतं. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्षमता सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते .याशिवाय यामध्ये विटामिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच फणसातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करतो त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते .फणसाच्या पानांमध्ये डायबेटीस नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात. फणसात कमी कॅलरी असतात व  फायबर जास्त असते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.फणसातील  अँटिऑक्सिडंटस त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. 


सध्या विगन आहार पद्धती अवलंबिणाऱ्यांसाठी कच्च्या फणसाची भाजी 'विगन मीट' म्हणजे मांसाहाराला पर्याय म्हणून खाल्ली जाते. फणसातील जॅकलिन आणि सॅपोनीन यामुळे कोणत्याही 

प्रकारच्या ट्युमरची वाढ होत नाही आणि कर्करोग प्रतिबंधासाठी देखील फणस औषधी मानला जातो. फणसातील ल्युटीन, झियाझानथिन, कॅरोटिनॉइड्स डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.


किंबहुना, वयपरत्वे दृष्टी कमी होऊ नये म्हणून फणसाचे गरे आहारात असणे आवश्यक आहे. फणसात असणारे तंतुमय पदार्थ पाचक मानले जातात. मलावरोध रोखण्यासाठी फणस खाणे उपयुक्त ठरते. अनेकदा आहार नियमन करताना  फणसाचे काप,गऱ्यांचे चिप्स खाण्याबद्दल प्रश्न विचारले जातात.फणस फळ म्हणून खाताना मिळणारे पोषक फायदे तळण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारण शून्य होऊन जातात. फणसात असणारे 'क' जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी होते. 

व्यायाम करणाऱ्यांसाठी उत्तम ऊर्जा देणार तसेच बऱ्याचअंशी 'ब' जीवनसत्त्वाचं अधिक प्रमाण असणारा फणस खेळाडूंसाठी मात्र अत्यंत उपयुक्त फळ आहे. 'वेगन' म्हणजेच वनस्पतीजन्य आहार करू इच्छिणायांसाठी फणस सगळ्याच पोषकतत्वांसाठी उत्तम पदार्थ आहे. फणसाच्या गऱ्यांचे त्यातील पाणी काढून तयार केले जाणारे पीठ, बियांपासून तयार केले जाणारे पीठ शाकाहारी आहारात पोषक मानले जाते.

संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top