बॅकडेट बोगस व बनावट, खोटी कागदपत्रे तयार करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती : मुख्याध्यापकाची विशेष चौकशी पथका ( SIT) कडून चौकशी:
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा दणका,
राज्याध्यक्ष मा.आकाश तांबेसिंधुदुर्ग प्रतिनिधी ;
तरळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरळे शाळेमध्ये ०२ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या भरती संदर्भात पुरावे सादर करून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अविनाश मांजरेकर यांच्या वरती तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री.आकाश तांबे यांनी केली आहे.
आज कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ येथे झालेल्या चौकशीला श्री.सुभाष चौगुले ( विभागीय सचिव ), शिक्षण उपसंचालक श्रीमती प्रभावती कोळेकर , शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती कविता शिंपी , उपशिक्षणाधिकारी श्री अजय शिंदे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोगस शिक्षक,शिक्षकेतरांच्या नियुक्त्या करून अशा नियुक्त्याचे प्रस्ताव अमान्य करून घेऊन मा.उच्च न्यायालयामध्ये जाऊन कोर्ट केसच्या माध्यमातून अशा अनियमित नियुक्त्या नियमित करण्याचे एक रॅकेट जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत या रॅकेटला शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे सहकार्य मिळत आहे.
यापूर्वी अशा ४९ वैयक्तिक शिक्षण सेवकांच्या अनियमित नियुक्तींना शिक्षणाधिकारी यांनी मान्यता दिलेल्या होत्या.यातील ०९) मान्यता विभागीय उपसंचालक यांनी रद्द केल्या होत्या. इतर मान्यता प्रकरणी चौकशी मा.शिक्षण संचालक कार्यालयामध्ये चौकशी प्रलंबित आहे. पुन्हा हे रद्द केलेले बोगस कर्मचारी मा.उच्च न्यायालयात गेले , शिक्षण उपसंचालकाने कोणतेही म्हणणे न दिल्यामुळे नियमित झाले.अश्या प्रकारे अनियमित बोगस कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करायच्या व कोर्टाच्या माध्यमातून त्या नियमित करायच्या असा प्रकार वारंवार या जिल्ह्यांमध्ये घडून येत आहे.
तरळे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तरळे या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश शिवराम मांजरेकर यांनी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वेळोवेळी निर्गमित केलेले पदभरती बंदी आदेश असताना शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी (शिपाई ) यांची नियुक्ती खोट्या बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केली आहे .प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश शिवराम मांजरेकर यांनी या कामी बॅकडेटेड बोगस व बनावट खोटी कागदपत्रे तयार करून शिक्षकेतर चतुर्थश्रेणी (शिपाई) श्री.कल्पेश देवानंद तळेकर व श्री.देवेंद्र उदय तळेकर यांचे वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मंजुरीसाठी आपल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक जि .प. सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव त्रुटी प्रभावी नामंजूर करून घेऊन उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी याच प्रशालेमध्ये श्री.पाडुरंग नारायण काणेकर ( HSC ATD) या शिक्षकाची प्रशालेच्या संचमान्यतेमध्ये पद नसताना नियुक्ती केली होती. सदर नियुक्तीला तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री.अशोक कडूस यांनी मान्यता दिली . याप्रकरणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने तक्रार दाखल केल्यावरती मा.विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी सदर वैयक्तिक अनियमित मान्यता रद्द केली होती.मात्र रद्द केल्यानंतर श्री.पाडुरंग काणेकर यांनी पुन्हा मा.उच्च न्यायालयामध्ये जाऊन याचिका दाखल केली.मा.उच्च न्यायालयामध्ये संबंधित शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षणाधिकारी यांनी आपले म्हणणे ( say ) न दिल्यामुळे मा.उच्च न्यायालयाने एकतर्फी निर्णय देऊन सदर कर्मचारी पुन्हा नियमित करण्यात आले. अशा प्रकारे बोगस कर्मचारी भरती करू ती नियमित करता येते अशा धारणेतूनच या प्रशालेमध्ये दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
श्री कल्पेश देवानंद तळेकर व श्री उदय देवेंद्र देवेंद्र उदय तळेकर यांची नियुक्ती ०८/१२/ २०१७ मध्ये केली असल्याचे दाखवून सदर प्रस्ताव मान्यतेसाठी ०४/१०/ २०२४ मध्ये दाखल केलेला आहे.या प्रस्तावातील सर्व खोटी व बनावट कागदपत्रे मुख्याध्यापक श्री.अविनाश शिवराम मांजरेकर यांनी तयार केलेली आहेत. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्काळ संबंधित मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.अशी मागणी करणारे निवेदन श्री. आकाश तांबे यांनी आयुक्त शिक्षण व एस.आय.टी कडे दिले होते. या प्रकरणी आयुक्त शिक्षण यांनी दखल घेऊन एसआयटी चौकशी लावली. याप्रकरणी कोल्हापूर विभागीय बोर्डाचे सचिव श्री.सुभाष चौगुले यांनी संबंधित शाळेचे ०३ माजी मुख्याध्यापक , विद्यमान मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर , संस्था अध्यक्ष /सचिव ,नियुक्त केलेले ०२ शिपाई यांना चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती.
आकाश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापक श्री. अविनाश मांजरेकर यांनी खालील बनावट कागदपत्रे तयार केली आहेत.
१) शिक्षण सेवक म्हणून नियुक्तीपत्राने शिपाई नियुक्ती
२) नियुक्ती ८/१२/२०१७ मधील मान्यतेसाठी प्रस्ताव सादर ०४/१२/२०२४ रोजी केले.
३) याकाळात सदर प्रशालेत एकूण तीन मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले. ४) जाहिरात बंद पडलेल्या सिंधुदुर्ग समाचार या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. ती जाहिरात बोगस आहे.५) शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे जाहिरात मागणी अर्ज केल्याची नोंद आवक रजिस्टर मध्ये नाही. पण मुख्याध्यकांनी जाहिरात मागणीच्या पत्राची खोटी OC तयार केली.६) जाहिरात प्रसिद्ध केली २५/११/२०१७ आणि ४ दिवसांनी दिनांक ०१/१२/२०१७ मुलाखती घेतल्या.७) मुलाखतीला उपस्थित उमेदवार सर्व बोगस . त्यांची चौकशी करावी.८) श्री. देवेंद्र उदय तळेकर याच्या हजर रिपोर्ट वर मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांची सही आहे. २०१७ मध्ये अविनाश मांजरेकर मुख्याध्यापक नाही.९) या प्रशालेच्या संच मान्यतेमध्ये शिपाई पद नाही.
१०) २०१७ मधील या प्रशालेची लेटरहेड आणि २०२४ मधील लेटरहेड मध्ये तफावत आहे.
११) या प्रशालेच्या रजिस्टर वरील संदर्भ आणि नोंदी तपासणे.१२) सन २०१७ पासून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा या नियुक्ती प्रक्रियेत सहभाग आहे का? याची चौकशी करणे. आदी मागण्या केल्या आहेत.
श्री. अविनाश शिवराम मांजरेकर मुख्याध्यापक वामनराव महाडिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तरळे यांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे.त्याच बरोबर मा.उच्च न्यायालयात खोट्या कागदपत्रांच्या आधारे शपथ पत्र दाखल केले. म्हणून त्यांच्यावरती तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने एसआयटीकडे केली आहे.
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
