खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद पुणे विभागीय अध्यक्षपदी बाळासाहेब कटारे यांची निवड.

Admin

 खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद पुणे विभागीय अध्यक्षपदी बाळासाहेब कटारे यांची निवड.

सांगली - महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी बाळासाहेब कटारे यांची निवड करण्यात आली. पुणे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय खाजगी प्राथमिक पदाधिकारी यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. त्यांच्या गतीमान, चौफेर कार्याची दखल घेऊन ही निवड घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आदर्श समाज निर्माण व्हावा यासाठी अनेक विधायक कार्य त्यांनी केले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, माध्यामिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, सुरेश राठोड, विजय सुर्यवंशी सोलापूर, बाळकृष्ण चोपडे, बी. एन कुंभार, ए. टी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
संपादक : श्री. प्रमोद काकडे +91 9595 85 75 10

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
To Top